Thursday 6 January 2011

पुजिते मंगळागौर...

पुजिते मंगळागौर...

जयदेवी मंगळागौरी, ओवाळीण सोनिया ताटी।
रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती, हिरे या मोतीज्योती॥

श्रावणातला पहिला मंगळवार म्हणजे नवविवाहितेसाठी मंगळागौरी पूजेचा दिवस. विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावणातल्या मंगळवारी हे क्रत करायचे असते व पाचव्या वर्षी त्याचे उद्यापन करायचे असते. या क्रतामागील उद्देेश गृहसौख्यप्राप्ती असला तरी महिलांना आनंदप्राप्तीचं फल मात्र लगेचच प्राप्त होत असतं.
पूर्वी मुलीच्या माहेरी एक व सासरी एक अशा दोन मंगळागौरी व्हायच्या. मात्र आता बदलत्या काळानुसार दोन्हीकडची मिळून एक मंगळागौर करण्याची पद्धत सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर खास मंगळागौरीसाठी हॉलही घेतले जातात. या दिवशी आजूबाजूच्या ओळखीच्या, नात्यातील लग्न झालेल्या मुलींना ‘वसोळी’ म्हणून बोलावतात. वसोळी म्हणजे जिच्या लग्नाला पाच वर्षे झालेली नाहीत व जिचे मंगळागौरीचे व्रत पूर्ण व्हायचे आहे अशा सुवासिनी.


फराळानंतर देवीची आरती केली जाते. आरतीनंतर आईने मुलीची ओटी भरायची असते. सासूनेही दागिना देण्याची पद्धत आहे.